सत्तार यांच्या भाजपा प्रवेशाला जुन्या कार्यकर्त्यांकडून विरोध

abdul sattar

जामनेर (प्रतिनिधी) । वर्षानुवर्षे पक्षात काम करणाऱ्या निष्ठा वान भाजपाच्या कार्यकर्त्यांचा विरोध डावलून माजी आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षात प्रवेश दिला तर त्यांना निवडणुकीत विजयी होवू देणार नाही, असा स्पष्ट इशारा सिल्लोड येथे झालेल्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत देण्यात आला.

शेकडो कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेवून पक्षाने सत्ताधार्याना भाजपात प्रवेश देवू नये. अन्यथा आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरवून त्यानांच विजयी करू असे, या बैठकीत ठणकावून सांगण्यात आले. कॉंग्रेसचे बंडखोर मा. आमदार अब्दुल सत्तार यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाला तिव्र विरोध दर्शविण्यासाठी सिल्लोड येथील स्वास्तीक लॉन सभाग्रुहामध्ये बैठक होवून.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरिश महाजन व अब्दुल सत्तार यांच्यात महाजन यांच्या निवासस्थानी बंदव्दार चर्चेनंतर सिल्लोडच्या भाजप कार्यकर्त्यांमधे निराशेचे वातावरण तयार होवून लागलीच सिल्लोड येथे स्वस्तिक लॉन्स येथे विरोध बैठक आयोजित करून अब्दुल सत्तार यांच्या पक्ष प्रवेशाला कडकडून विरोध दर्शविला.

आ.अब्दुल सत्तारला भाजपा पक्षातील प्रवेश विरोधात सर्व स्तरावरील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची सभा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना सोबत माजी आमदार सांडु पाटील लोखंडे, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोठे, सिध्देशवर सहकारी साखर कारखाना चेअरमन इद्रीस मुलतानी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनिल पाटील मिरकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप काका दानेकर, विलास पाटील, माजी सभापती अशोक दादा गरूड,पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर तायडे, सोयगाव भाजपा तालुकाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, माजी नगराध्यक्ष कैलास दादा काळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र जैस्वाल, माजी चेअरमन श्रीरंग पाटील साळवे, जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे, गजानन राऊत, गणेश पाटील बनकर, अरूण काळे, सुनिल पाटील काळे, मंगेश सोहणी, सुनिल ठोंबरे आदींसह पंचायत समिती सदस्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Add Comment

Protected Content