अखेर २३ वर्षानंतर मिळाले यावलच्या मयत जवानाच्या कुटुंबियास पेन्शन

yawal pesio

यावल (प्रतिनिधी)। येथील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका तरूण सैनिकाच्या अकाली निधनानंतर त्याच्या कुंटुबास पेन्शन मिळवण्यासाठी दोन दशकापेक्षा ही अधिक काळ वाट बघावी लागली व अखेर त्या मयत सैनिकाच्या कुंटुबाच्या पेन्शन लागू करण्यात आली. देशाच्या रक्षणासाठी आपले प्राण देणाऱ्या सैनिकाच्या कुंटुबास आपल्या मरण पावलेल्या मुलाच्या पेन्शन मिळवण्यासाठी तब्बल २३ वर्ष वाट बघावी लागली हेच आपल्या देशाच्या सैनिकाचे दुदैव म्हणावे का असा प्रश्न समोर आला आहे.

या संदर्भातील वृत असे की, यावल येयील शिवाजी नगर परिसरात राहणारा संतोष अर्जुन कोळी क्य२१ वर्ष हा कमी शिकलेला होता तरी देशासाठी आपण काही करावे असे तो स्वप्न पाहत असे, आणी १९९४ या वर्षी त्याला सैन्य भरतीची संधी मिळाली त्यात तो पात्र ठरला त्यास एक वर्षाच्या सैन्य प्रशिक्षणासाठी बॉर्डर सेक्युरीटी फॉर्स च्या बॅच क्रमांक५७मध्ये त्यास उधमपुर येथे संतोष कोळी ची निवड करण्यात आली, त्यानंतर त्याने १९९५मध्ये गुजरातच्या कच्छ सिमारेेषेवर देशाचे रक्षण केले, त्यानंतर तो १९९६ या वर्षी तो दोन महीन्याच्या सुटीवर आपल्या घरी आला असता २६ जुलै १९९६ रोजी संतोष कोळी याचे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले त्याच्या निधनानंतर काही दिवसांनी त्याचे वडील अर्जुन गणेश कोळी यांचेही निधन झाले.

कुंटुबातील दोन महत्वाची व्याक्ती ही अशा प्रकारे निघुन गेल्याने मयत सैनिक संतोष कोळीच्या कुंदुबावर संकट ओढवले गेले. या संकटाशी संतोषचे कुंटुब मागील २३ वर्षापासुन अत्यंत संर्घषाचे जिवन जगणाऱ्या कोळी कुंटुबास अकाली निधना झालेल्या सैनिकाच्या कुंटुबाला यावल तालुक्यातील सैनिक महेन्द्र पाटील यांच्या अथक मदतीने सहकार्यातुन २३ वर्षाच्या लांब प्रवासानंतर अखेर न्याय मिळाला असुन, मयत सैनिक संतोष अर्जुन कोळीच्या वयोवृद्ध आई वत्सलाबाई अर्जुन कोळी वय ८० वर्ष आपल्या मरण पावलेल्या सैनिक पुत्राला न्याय मिळाला म्हणुन शासनाचे आभार मानले आहे. वत्सलाबाई कोळी या आपला मोठा मुलगा सुनिल अर्जुन कोळी व विधवा मुलगी रेखा पंडीत साळुंके आणी नातवंडे यांच्या सोबत यावल येथे वास्तव्यास आहे.

Add Comment

Protected Content