प्रधान सचिवांच्या आश्वासने स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे आंदोलन स्थगित

 

पाचोरा, प्रतिनिधी । आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात २६ जानेवारी रोजी नाशिक आयुक्ताशी बोलणी फिस्कटल्याने २७ रोजी थेट आदिवासी विकास मंत्रालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेराव घातल्याने प्रधान सचिव अनुप कुमार यादव यांनी लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

अनेक दिवसापासून राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी आत्मक्लेश आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. २६ रोजी प्रजासत्ताक दिनी नाशिक आयुक्तालय समोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. आयुक्तांची बोलणी फिसकटल्यावर थेट आदिवासी मंत्रालयावर शिक्षकांनी मोर्चा काढून आंदोलन सुरू केले. यावेळी आमदार राऊत ढिकले हे उपस्थित होते. आदिवासी विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव अनुप कुमार यादव यांच्याशी बोलणी दरम्यान यादव म्हणाले की, सर्व समस्यांचे निराकरण पुढील आठवड्यात करण्यात येईल. असे तोंडी आश्वासन दिल्यावर संघटनेने आक्रमक धोरण स्वीकारून आम्हाला लेखी आश्वासन द्या तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ अशी ठाम भूमिका राज्याध्यक्ष भरत पटेल यांनी घेतल्याने, आदिवासी सचिवांना नमते घ्यावे लागले. लेखी आश्वासन दिल्यानंतरच भरत पटेल यांनी आंदोलन स्थगित केले अशी माहिती जळगाव जिल्हा प्रसिद्धीप्रमुख उत्तमराव मनगटे पाटील यांनी दिली आहे. यावेळी हिरालाल पवार, विजय कचवे, जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील, लोकेश पाटील, रमेश चव्हाण, भूषण भदाणे, संजय भदाणे, रजनीकांत भामरे, विवेक पाटील, जे. बी. पाटील, आदींनी सचिवांशी चर्चेदरम्यान सहभाग घेतला.

Protected Content