टाकळी खाते शिवारात धुमाकूळ घालणारे अस्वल जेरबंद

जळगाव जामोद (अमोल सराफ)। जळगाव जामोद तालुक्यातील टाकळी शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला वनविभागाच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न करून अखेर जेरबंद करण्यात आले आहे. त्याला सातपुडाच्या जंगलात सोडण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव जामोद तालुक्यात मागील एका आठवड्यात अकोला खुर्द, सूनगाव या परिसरात अस्वल आढळले होते. अकोला खुर्द येथील अस्वलाचे रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला सातपुडाच्या जंगलात सोडण्यात आले होते. तर पुन्हा सुनगाव गाव परिसरात अजून एका अस्वल दिसून आल्याने गावकऱ्यांनी त्याला हुसकून लावले होते. टाकळी खाती परिसरात अस्वलाचे वास्तव दिसून आले. त्यानुसार शनविारी २९ जानेवारी रेाजी आसलगाव गट ग्रामपंचायत येथील टाकळी खाते शिवारात अस्वल असल्याची सकाळी १० वाजेच्या सुमारास माहिती मिळाली. आसलगाव ग्रामपंचायतचे युवा सरपंच, उपसरपंच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वनविभागाला कळविले असता जळगाव वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, परंतु अस्वलाला पकडण्यास यश न आल्याने अखेर त्यांनी बुलढाणा येथे फोन करून रेस्क्यू टीमला पाचारण केले.

दिवसभराच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास अस्वलाला रेस्क्यू टीम बुलढाणा यांनी पिंजऱ्यामध्ये कैद केले. अस्वल पिंजऱ्यामध्ये करीत होताच टाकळी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

 

Protected Content