बेंडाळे चौकात महिलेच्या पर्समधून सोन्याची पोत व रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बेंडाळे चौकातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने १८ हजारांची रोकड आणि सोन्याची पोत असा एकुण ३९ हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना उडघकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शनिवारी २९ जानेवारी रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांताबाई दादाराव वाघ (वय-४५) रा. सतगुरू नगर, अयोध्या नगर जळगाव ह्या दोन मुलींसह वास्तव्याला आहे. त्याचा महिनीचा मुलगा आकाश बाविस्क याने मुथूट फायनान्स येथे त्यांची सोन्याची चैन गहाण ठेवली होती. ती सोन्याची पोत सोडविण्यासाठी कांताबाई वाघ ह्या शनिवारी २९ जानेवारी रेाजी बेंडाळे चौकातील एटीएम येथे पैसे काढण्यासाठी आल्या. एटीएम मध्ये आधीच दोन अनोळखी पैसे काढण्यासाठी उभे होते. त्यावेळी कांताबाई वाघ यांनी दोघांना एटीएम मधून पैसे काढण्याची विनंती केली. त्यांच्या एटीएम मधून दोघांनी पैसे काढून दिले.  काढलेले पैसे ठेवण्यासाठी पर्स मध्ये हात घातला असता त्यांना घरून आणलेले १८ हजार रूपये रोख आणि २१ हजार रूपये किंमतीचे सोन्याची पोत असा एकुण ३९ हजार रूपयांचा मुद्देमाला अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ४.३० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.

 

Protected Content