संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दहा जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यासह राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरात विनाकारण फिरणाऱ्या ५ जणांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज एमआयडीसी पोलीसांनी पेट्रोलींग केली त्यात सहा जणांनी जमाव बंदीचे आदेश असतांना आदेशाचे पालन न करता निर्धास्तपणे मोटारसायकलवर बाहेर फिरतांना आढळून आले. भादवी कलम १४४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. यात अन्वर शब्बीर कुरेशी (वय-३०) रा.डायमंड हॉलच्या पाठीमागे मासुमवाडी, हमीद लालख पठाण (वय-४४) रा. दत्त नगर, मेहरूण, दिपक रामचंद्र ठाकूर (वय-२८) रा. वराडसिम ता.भुसावळ, राजाराम सोपान अपार (वय-४६) रा. सुप्रीम कॉलनी, गणेश कडुबा घोंगडे (वय-२४) रा. लेले नगर, पहुर, सुनिल श्रावण आव्हाड (वय-३५) रा. सबजेलच्या पाठीमागे, गणेश नगर,कन्हैय्या राजेश गारूंगे (वय-४०) रा.जाखनी नगर, कंजरवाडा, अजय बिरजु गारूंगे (वय-२८) रा.तांबापुरा, मेहरूण, चंद्रकांत जोशी (वय-१९) रा.जुनी जोशी कॉलनी, गोरक्षनाथ मंदीराजवळ आणि भुषण विजय माळी (वय-१९) रा. तुकाराम वाडी, पेट्रोल पंपाच्या मागे जळगावयांच्यावर कारवाई करत भादवि कलम १४४ प्रमाणे एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली करवाई
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पो.ना. राजेंद्र ठाकूर, पो.ना. कृष्णा पाटील, पो.कॉ. चेतन सोनवणे, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. योगेश बारी यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

Protected Content