मनपा बेकायदेशीर उड्डाण पदोन्नत्या प्रकरणी कारवाईची मागणी (व्हिडिओ)

जळगाव,प्रतिनिधी  | जळगाव महापालिकेत बेकायदेशीर उड्डाण पदोन्नत्या करण्यात आल्या असून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी जळगाव जिल्हा जागृत जनमंचाने आज केली आहे. या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन शिवराम पाटील, अनिल नाटेकर आणि चंद्रकांत पंधारे यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले.

तत्कालिन जळगाव नगरपालिकेत  सन १९९१-९२ ते १९९७-१८ मध्ये विहित कार्यपध्दतीचा अवलंब न करता नियुक्त्या व पदोन्नत्या देण्यात आल्या होत्या. या नियुक्त्या रद्दबातल करण्याबाबत, पदावनत करण्याबाबत अन्य शास्ती लावण्याबाबतचे पत्र  महिन्यापूर्वी  नगरविकास खात्याकडून येवून देखील त्याची अंमलबजावणी मनपा आयुक्त करीत नसल्याचा आरोप शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघ अध्यक्ष अनिल नाटेकर यांनी केला.

तर महापौर जयश्री महाजन व  पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शासनाचे प्रतिनिधी असतात त्यांनी या बोगस भरतीचे समर्थन करू नये. समर्थन करायचे असेल तर आधी पदाचा राजीनामा द्या मग समर्थन करावे  अशी मागणी महाराष्ट्र जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी केली आहे. नगरविकास खात्याचा आदेश येवून एक महिना झाला मात्र त्याचे पालन करण्यात आलेले नाही. यासंदर्भात आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेऊन राजेंद्र पांडुरंग पाटील, उदय मधुकर पाटील, नरेंद्र चौधरी यांच्याकडून महापालिका कर्मचाऱ्यांकडून सातवे वेतन आयोग लागू करण्याच्या नावाखाली  पैसे वसूल केले जात आहेत. हे पैसे आयुक्त व नगरविकास खात्यातील एका व्यक्तीला देण्यासाठी जमा केले जात असल्याचा गंभीर आरोप शिवराम पाटील यांनी केला आहे. त्यांना आमदार राजूमामा भोळे देखील मदत करत असल्याचा गंभीर आरोप श्री.पाटील यांनी यावेळी केला आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/270744924938605

 

Protected Content