डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  अकोला जिल्हयातील हिवरखेड येथील शिबिरातून मणकाविकारांनी त्रस्त ५७ वर्षीय रूग्णावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून दुसऱ्याच दिवशी रूग्ण चालू लागला.

 

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ऑर्थोपेडीक सुपर स्पेशालिटी क्‍लिनिकचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. जळगाव शहरातील प्रख्यात स्पाईनविकार तज्ञ डॉ. अजय कोगटा आठवड्यातील दर गुरूवारी या क्‍लिनिकमध्ये सकाळी १० ते १ या वेळेत उपलब्ध असतात.  दि १३ हिवरखेड येथील ५७ वर्षीय रूग्णावर डॉ. दिपक अग्रवाल, डॉ. प्रमोद सारकेलवाड, भुलरोग तज्ञ डॉ. शितल ढाके यांच्या सहकार्यांने केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. यावेळी निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. सुनित वेलणकर, डॉ. परिक्षीत पाटील, डॉ. राहूल जनबंधू, डॉ. प्रसाद बंबारसे, डॉ. चाणक्य,  डॉ. पियुष पवार यांनी देखिल सहकार्य केले. गुरूवारीच संध्याकाळी या रूग्णांला फरक जाणवल्याचे दिसून आला. त्याला जाणवणाऱ्या वेदना एकदम बंद झालेल्या होत्या. तसेच तो चालू लागल्याने चेहऱ्यावर  समाधानाचे भाव दिसून येत होते.

गेल्या ८ वर्षापासून या रूग्णास पाठीचे दुखणे व पायातील वेदना जाणवत होत्या. स्थानिक डॉक्टरांकडून औषधाने काही काळापूरतीच बरे वाटत परत येरे माझे मागल्या या प्रमाणे वेदना सहन करणे चालू होते. वेदना असहय झाल्याने शेवटी एक्स रे करण्यात आल्यावर मणक्याची एल ४ व एल ५ गादी सरकल्याचे लक्षात आल्याने शस्त्रक्रियेचा पर्याय समोर आला. सुमारे एक ते दिड लाख रू खर्च लागणार असल्याने रूग्णांने शिबिरात तपासणी केली असता योजनेत मोफत शस्त्रक्रियेचा पर्याय समोर आल्याने येथे अ‍ॅडमिट होवून गुरूवारी त्यांच्यावर योजनेत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

सेट्रींग काम करतांना दोन ते तिन वेळा पडल्याने मला मार लागून मणक्याचा त्रास सूरू झाला होता. पाठीचे दुखणे गेल्या ८ वर्षापासून पाजवीला पूजले होते. अशातच पायातील ताकद कमी होत जावून कामावर जाणे बंद झाले. परंतू येथे आल्यावर एकाच दिवसात चालायला लागल्याने आनंद गगनात मावत नाही. येथील सेवेने समाधानी असून डॉक्टर, कर्मचारी सेवाभावी वृत्‍तीचे असल्याचे रूग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.

 

Protected Content