बुलढाणा जिल्ह्यात वसुबारस साजरी 

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण असून त्याची सुरुवात वसुबारसच्या सणाने होते. यंदा 21 ऑक्टोबरला व 22 ऑक्टोंबर अशा दोन दिवस आपण हा सण वसुबारसचा सण साजरा केला जाऊ शकतो. वसुबारसला ‘गोवत्स द्वादशी’ असे देखील म्हणतात.

यामध्ये जनावरांची पूजा केली जाते. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. काही ठिकाणी काल तर काही ठिकाणी आज सकाळपासून वसुबारस ची धामधूम पाहायला मिळाली. यानिमित्त शहरी हे ग्रामीण भागापर्यंत गाय वासराची मनोभावे पूजा अर्चा करून त्यांना ओवाळण्यात आले. तर एकंदरीत दोन वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा दिवाळीच्या या महत्त्वाच्या वसुबारस पासून आता पुढील काही दिवस दिवाळीची धामधूम राहणार आहे.

Protected Content