जेसीआयतर्फे रेल्वे मालधक्क्यावर मजुरांना मास्क, होमिओपॅथीच्या गोळ्यांचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी । येथील जेसीआय जळगाव शाखेने शहरातील रेल्वेच्या मालधक्क्यावर जड-जोखमीचे काम करणार्‍या मजुरांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क आणि आर्सनीक अल्बम ३० या औषधांचे वाटप केले.

सध्या करोनाने जनता मोठ्या प्रमाणात त्रस्त असून, टाळेबंदी पुन्हा वाढल्याने मजुरी करुन पोट भरणार्‍यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. काळजी घेण्याची खुप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असुन सॅनिटायर्स, शारीरिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर अतिआवश्यक झाला आहे. यासाठीच गरीब मजुरांना मास्क, आर्सेनिक अल्बम ३० औषधांचे वाटप नुकतेच करण्यात आले. ४५० मजुरांना लाभ झाला आहे. वाटप करतांना जळगाव जेसीआयचे अध्यक्ष शरद मोरे, आय.पी.पी. प्रतिक शेठ, रोहित मोरे यांनी शारीरिक अंतर राखत वस्तू व औषध वाटप केले. वाटप करतांना मजुरांच्या चेहर्‍यावर मोठा आनंद दिसत होता. जळगावात आतापर्यंत सर्वदुर वाटप होत असतांना या भागात कोणतीही संघटना आतापर्यंत आली नसल्याचे खंत मजुरांनी व्यक्त केली. लवकरच या कामगारांसाठी आरोग्य शिबीरचे आयोजन करण्याचा मानस अध्यक्ष शरद मोरे यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या कार्यकाळात जेसीआय,जळगाव विविध उपक्रम राबवत असून यात पोलीस कर्मचार्‍यांना बदाम लस्सीचे वाटप, त्यानंतर समता नगर, हरीविठ्ठल नगर, खंडेराव नगर या भागात केळी वाटप करण्यात आले होते. त्यानंतर गोलाणी मार्केटमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी येणार्‍या बांधवांसाठी सॅनीटायझर, साबण, पाणी असा उपक्रम घेतला. गरजुंना किराणा सामान वाटप देखील करण्यात आला.

Protected Content