मोबाईल लांबवणाऱ्या दोन संशयित आरोपींना एरंडोल येथून अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील चार घरातून सहा मोबाईल लांबवणाऱ्या दोन संशयित आरोपींना एरंडोल येथून अटक करण्यात आली आहे. शनिवार, दि.२५ जून रोजी दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “ राहुल वासुदेव शिपी, रा- हनुमान नगर, रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव यांच्या राहते घरातून मोबाईल तसेच त्याच परिसरात राहणारे शुभम आनंदा अहिरे, रेखाबाई उल्दव जाधव, मंगेश मोहन सोनवणे यांचे घरातुन चोरट्यांनी एकुण ०६ मोबाईल चोरून नेले होते . याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवार, दि.२० जून रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना सदरची चोरी ही योगेश राजेंद्र चौधरी, रा आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव व सुधीर सुभाष भोई, रा- साईबाबा मंदिराजवळ, एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव यांनी केल्याबाबत माहिती मिळाली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहा फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, गणेश शिरसाळे, नाना तायडे, मुकेश पाटील व साईनाथ मुंढे यांनी शनिवार, दि. २५ जून रोजी सकाळी एरंडोल येथून दोन्ही संशयित आरोपींना अटक केली.  त्यांनी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहे. दुपारी न्यायमुर्ती खंडाळे यांच न्यायालयात हजर केले असता दि. २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content