देवरूप फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | हरिविठ्ठल नगरातील न्यु जागृती मित्रमंडळ संचलित जिजामाता माध्यमिक विद्यालयात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

शाळेतील १२० गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला. याप्रसंगी देवरूप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. शरद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अपेक्षा व्यक्त केली की उपस्थित विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊन देश व समाजाची सेवा करतील.

देवरूप फाउंडेशन बहुद्देशीय समाजसेवी संस्था असून मुख्यतः शिक्षण व पर्यावरण या क्षेत्रात कार्य करते. शालेय साहित्य वाटप प्रसंगी देवरूप संस्थेचे शरद पाटील, रुपाली पाटील, हर्षल पाटील, चेतन दुसाने, लोकेश साळुंखे, सागर सोनावणे, उदय पाटील हे उपस्थित होते.

शाळेचे क्रीडा शिक्षक किशोर पाटील, कला शिक्षक दिनेश सोनवणे उपस्थित होते. सदर कार्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक खोरकडे यांनी देवरूप फाउंडेशनचे आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.