शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल ९४ टक्के; स्नेहा पांडेय प्रथम, तर सोनम सिंग द्वितीय

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा वैद्यकीय अभ्यासक्रमाचा (एमबीबीएस) निकाल नुकताच लागला. त्यात जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा निकाल हा ९४ टक्के लागला आहे. यात स्नेहा हरिवंश पांडेय हिने महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

महाविद्यालयातील स्थापनेपासूनची हि दुसरी बॅच आता उत्तीर्ण होऊन आंतरवासीता प्रशिक्षण घेऊन आरोग्यसेवा देण्यासाठी रुग्णालयात रुजू झाले आहे. महाविद्यालयाच्या निकालात विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळाले आहे. प्रथम क्रमांकावर स्नेहा हरिवंश पांडेय असून द्वितीय क्रमांकावर सोनम शिवकुमार सिंग तर तृतीय येशा संघवी या तिन्ही मुलींनी ‘टॉप थ्री’ मध्ये बाजी मारली आहे. १३ विद्यार्थ्यांना स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विषयात डिस्टिंक्शन मिळाले आहे.

या विद्यार्थ्यांचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे (पदव्युत्तर), उप अधिष्ठाता डॉ. मारोती इंगोले (पदवीपूर्व) यांच्यासह विविध विभागप्रमुखांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थी आता आंतरवासीता प्रशिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयाच्या रुग्णालयात रुजू झाले आहे. नुकतेच त्यांना डॉ. योगिता बावस्कर यांच्यासह विभागप्रमुखांनी प्रशिक्षण दिले. आता रुग्णसेवेसाठी विद्यार्थी सज्ज होऊन रुजू झाले आहे.

Protected Content