जळगावात व्यवसायिकांकडून प्लास्टिक कॅरीबॅग जप्त (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्लास्टिक बंदीवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी अतिक्रमण विभागाच्या पथकाने सुभाष चौक, फुले मार्केटसह विविध भागातील व्यावसायिकांकडून सिंगल युज प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करून नष्ट करण्यात आले.

 

शहरात प्लास्टिक बंदी नियमानुसार गेल्या आठवड्यापासून प्लास्टिक उत्पादकांवर आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी कारवाई करत जवळपास ६ टन सिंगल युज प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या होत्या. यानंतर त्यांनी शुक्रवारी २० मे रोजी विविध व्यवसायिकांची महापालिकेत आयुक्त डॉ. गायकवाड यांनी बैठक घेऊन सिंगल युज प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर न करण्याचे व्यावसायिक व नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार सिंगल युज कॅरीबॅग वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर सोमवारी २३ मे रोजी सकाळी शहरातील सुभाष चौक, फुले मार्केट परिसरासह इतर भागात धडक कारवाई करत व्यावसायिकांकडून पाच ते सहा किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. या जप्त केकेल्या कॅरीबॅग व्यावसायिकांच्या समोरच नष्ट करण्यात येत होत्या. नागरीकांनी प्लास्टिक कॅरीबॅगेचा वापर करून नये, असे आवाहन, अतिक्रमण विभागाचे अधिक्षक इस्माईल खान यांनी दिली आहे.

 

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण अधिक्षक इस्माईल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संजय ठाकूर, किशोर सोनवणे, नाना कोळी, शेखर ठाकूर, साहेबराव शंकपाळ, दीपक कोळी, हिरामण बाविस्कर, भानू ठाकरे आदींच्या  पथकाने ही कारवाई केली.

Protected Content