माना-पानाचा विषय नडला; बालविवाह प्रशासनाने रोखला

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । लग्नात वडीलधाऱ्यांना मान द्यावा लागतो. मात्र, यावल तालुकातील साकळी येथील लग्नात मावस भावाला मान मिळाला नाही. या रागातून संबंधित बालविवाह होत असल्याची माहिती बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे तात्काळ अर्ज पाठविल्याने बालविवाह रोखण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, आज २३ मे रोजी साकळी तालुक्यात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गोपाळ ज्ञानेश्वर आढाळे (वय २७) यांचा विवाह ठरलेल्याप्रमाणे होत होता. मात्र नवरीच्या मावसभाऊ रविन्द्र शालीक सोनवणे यांनी यावल येथे महिला व बालविकास प्रकल्पच्या प्रभारी अधिकारी अर्चना आटोले यांच्याकडे या बालविवाह संदर्भात अर्ज दिला. या अर्जाची तात्काळ दखल घेत कत्पना तायडे व मंगला नेवे यांनी साकळी येथील भवानी माता मंदीर हॉल लग्नास्थळी जावुन हा होणारा बालविवाह थांबविला.

महिला व बालविकास प्रभारी अधिकारी अर्चना आटोले, कल्पना तायडे पर्यवेक्षिका व साकळी अंगवाडीच्या सेविका मंगला नेवे यांच्या मदतीने यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांनी हा विवाह थांबविला. लग्न लावणाऱ्या दोघाकडील मंडळीला पोलीस ठाण्यात बोलविण्यात आल. यावेळी महिला बालविकास अधिकारी अर्चना आटोले यांच्या मध्यस्थळीने मुलगी ही अल्पवयीन असल्याने सदरचा विवाह लावता येणार नाही तसे झाल्यास आपल्या विरूद्ध गुन्हे दाखल होतील, अशी माहिती वधु वराच्या मंडळींना पोलिसांकडुन मिळाल्याने अखेर हा अल्पवयीन मुलीचा विवाह थांबला. या संदर्भात पोलीसांनी वधु आणि वर मडंळीचे जाब जबान घेतल्याने दोघ लग्न लावणारी मंडळी ही आपआपल्या गावी निघुन गेली.

दरम्यान, मानापानाचा विषय नडला व वधुचा मावसभाऊ रविन्द्र शालीक सोनवणे याच्या अर्जाने हा विवाह रखडला. आपल्या बहिणीच्या विवाह व्हावा, यासाठी धावपळ करणाऱ्यांनीच महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सदरचा विवाहितील नवरी ही अल्पवयीन असल्याचे दाखले व अर्ज २२ मे२०२२ रोजी येथील कार्यालयात दिल्यानेच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

Protected Content