Home Cities जळगाव भुसावळ-फैजपूर महामार्गावरील वाहतूक महिनाभरासाठी बंद ; वाहनांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

भुसावळ-फैजपूर महामार्गावरील वाहतूक महिनाभरासाठी बंद ; वाहनांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

0
294

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ-फैजपूर मार्गावर रस्ते सुधारणा कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर राज्य महामार्ग क्रमांक ४४ वरील भुसावळ-फैजपूर रस्ता १७ जून २०२६ ते १६ जुलै २०२६ या कालावधीत तात्पुरता बंद ठेवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत.

आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यित महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत राज्यसीमा विटवा-भुसावळ-जामनेर-फैजपूर-मोठाळा-तरवाडी फाटा या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी संबंधित मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करून पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस कायदा कलम ३३ (१) (बी) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पोलीस अधीक्षक जळगाव श्रीकांत धिवरे यांनी वाहतूक मार्ग बदलाचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार रा.मा. क्रमांक ४४ वरील भुसावळ-फैजपूर रस्ता १७ जून ते १६ जुलैपर्यंत वाहनांसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जड वाहनांसाठी फैजपूर-हंबर्डी-हिंगोणा-सांगवी-चिंतोडा-यावल-भुसावळ या मार्गाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर हलक्या वाहनांसाठी फैजपूर-हंबर्डी-भालोद-चिखली-अंजाळे-भुसावळ या मार्गाचा वापर करता येणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच रस्ते सुधारणा काम सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी वाहनधारकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी फैजपूर, यावल, भुसावळ शहर, रावेर, निंभोरा, सावदा आणि जामनेर पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच फैजपूर, भुसावळ आणि पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस नियंत्रण कक्ष जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ जळगाव आणि अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाला या आदेशाची माहिती देण्यात आली आहे


Protected Content

Play sound