वस्त्रोद्योग घटकांनी तपासणी सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

जळगाव (प्रतिनिधी) रेशीम विकास कार्यक्रम पायाभूत सुविधा निर्मिती व अस्तित्वातील सुविधांचे बळकटीकरण या योजनेतंर्गत सास्मिरा (SAMIRA) मुंबई या संस्थेस गॅस क्रोमाटोग्राफी मास स्पेक्ट्रोस्कोपी (GAS CHROMATOGRAPHY MASS SPECTROSCOPY) (GCMS) ही मशनरी खरेदी करण्यास राज्य शासनाने निधी वितरीत केला आहे.

गॅस क्रोमाटोग्राफी मास स्पेक्ट्रोस्कोपी (GAS CHROMATOGRAPHY MASS SPECTROSCOPY) (GCMS) या यंत्राव्दारे वस्त्रोद्योगातील रेशीम, सूत, कृत्रिम यार्न, कापड, रंग, रसायने व डाईज इत्यादीचे तपासणी करण्यात येवून कापडातील घातक रंग व रसायनाचे प्रमाण योग्य/अयोग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. तपासणीअंती निदर्शनास येणा-या अडचणीवर तांत्रिक उपाययोजना देखील सास्मिरा (SAMIRA) मुंबई यांचेकडून केली जाईल. याकरीता वस्त्रोद्योग घटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content