भाजपने जिल्हा परिषदचा गड राखला ; अध्यक्षपदी रंजना पाटील

bjp

जळगाव (प्रतिनिधी) भाजपने जिल्हा परिषदमधील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे. जि.प. अध्यक्षपदी रंजना प्रल्हाद पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील हे निवडून आले आहेत.  दरम्यान, यानिमित्ताने महाविकास आघाडीचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग भाजपने हाणून पाडलाय.

 

महाविकास आघाडीकडून जि.प.अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या रेखाबाई दीपक राजपूत तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या जयश्री अनिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपच्या रंजना पाटील यांनी व लालचंद पाटील  यांनी बाजी मारली आहे. 34 विरुद्ध 31 मतांनी भाजपने बहुमत मिळविले आहे. थोडक्यात जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या पहिला प्रयोग भाजपने हाणून पाडला आहे. दरम्यान, आज सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा झाल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी माध्यमांना दिली होती. आज जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लक्षात घेता, खडसे यांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांना यश आल्याचेच बोलले जात आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/772051179967086/

Protected Content