दुचाकीचा कट लागल्याने दोघांना बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून दुचाकीवरील दोघांना शिवीगाळ करून लाकडी दांडूक्याने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. यात दोघे जखमी झाले असून उपचारानंतर रात्री उशीरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, अमोल पांडुरंग चौधरी (वय-४९) रा. खेडी ता.जि.जळगाव हे शेती काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. १८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता अमोल चौधरी हे सालदार दारासिंग पावरा याच्यासोबत (एमएच १८ वाय ७८८६) क्रमांकाच्या दुचाकीने शेतावर जात असतांना समोरूण येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला कट मारला. यावर अमोल चौधरी यांनी गाडी व्यवस्थीत चालवा असे सांगितले. याचा राग आल्याने संशयित आरोपी भुषण रघुनाथ सपकाळे आणि प्रविण गोकुळ सपकाळे रा. खेडी बु॥ ता.‍िज.जळगाव यांनी अमोल चौधरी यांचा रस्ता आडवून भुषण सपकाळेने शिवीगाळ केली व लाकडी दांडुक्याने बेदम मारहाण केले. यात अमोल चौधरी व सालदार पावरा दोघे जखमी झाले. दोघांनी उपचार घेतल्यानंतर रविवारी रात्री उशीरा तालुका पोलीस ठाण्यात अमोल चौधरी यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशिल पाटील करीत आहे. 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.