जळगावात हटकर समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

जळगाव प्रतिनिधी । येथील हटकर समाज प्रगती मंडळ व धनगर समाज उन्नती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक विवाह सोहळा व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

हटकर समाज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यात समाजातील १२ जोडपी विवाहबद्ध झाली. यासोबत समाजातील विविध पदांवर कार्यरत असलेल्या १२ समाज बांधवांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर सीमा भोळे, उपमहापौर अश्‍विन सोनवणे, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक ललित कोल्हे, मनपा गटनेते भगत बालाणी, अमीत देशमुख आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात डॉ. अमोल भास्कर (आरोग्यसेवा), डॉ. प्रियंका पाटील (उपजिल्हाधिकारी), डॉ. उमा ढेकळे (कक्षाधिकारी, मंत्रालय), आरोग्यदूत अरविंद देशमुख, गणेश हटकर (मंडळ अधिकारी), शालिक हटकर (स्टेनो हायकोर्ट), लहू हटकर (मुंबई पोलीस), चंदू हटकर (मुंबई पोलीस), गोकुळ हटकर (मुंबई पोलीस), राजेश देशमुख (वित्त लेखानिरीक्षक), किशोर देशमुख (जिल्हा नियोजन कार्यालय), आर. बी. सोनवणे (जलसंधारण विभाग) या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी तर आभार विनोद पाटील यांनी मानले.

यशस्वीतेसाठी माजी महापौर सदाशिव ढेकळे, वसंत भालेराव, रमेश सुशीर, कडू हटकर, संजय ढेकळे, मधुकर ढेकळे, त्र्यंबक ढेकळे, बाळासाहेब ढेकळे, विनोद पाटील, शिरीष पाटील, डी.बी. पांढरे, अशोक हिवराळे, अभिमन्यू हटकर यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Add Comment

Protected Content