Home क्राईम फुले मार्केट परिसरातून महिलेच्या पर्समधून ३५ हजारांची रोकड लांबविली

फुले मार्केट परिसरातून महिलेच्या पर्समधून ३५ हजारांची रोकड लांबविली

0
40


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील फुले मार्केट येथील विनोद टेक्सटाईल दुकानासमोर एका महिलेच्या पर्समधून ३५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शनिवार १३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, उषा सुनील भोई वय-२९, रा, आव्हाणा ता.जि. जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेंगदाणे फुटाणे विक्री करून ते आपल्या उदरनिर्वाह करतात. शनिवार १३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास महिला ह्या जळगाव शहरातील फुले मार्केट येथील विनोद टेक्स्टाईल कापड दुकानासमोर आले होते. त्यावेळी त्यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी संपूर्ण फुले मार्केटमध्ये शोध घेतला परंतू त्यांना पैसे पैशांबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सोमवारी १५ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound