चैतन्य तांडा येथे रॅपिड टेस्ट शिबिराचे आयोजन

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चैतन्य तांडा येथे आज कोव्हीड रॅपिड टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

यावेळी एकूण पंचवीस जणांने कोरोना चाचणी करून घेतली व सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहे. ‌कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरली असली तरी तीसरी लाट थोपविण्यासाठी तालुक्यातील चैतन्य तांडा येथे कोव्हीड रॅपिड टेस्ट शिबिराचे आयोजन सोमवार रोजी  ग्रामपंचायतीत करण्यात आले. यावेळी एकूण पंचवीस जणांनी कोव्हिड चाचणी करून घेतली. दरम्यान सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आल्याने दिलासादायक चित्र येथे पहायला मिळाला. 

यावेळी सरपंच अनिता दिनकर राठोड, उपसरपंच आनंद राठोड, डॉ. घनश्याम राठोड, आरोग्य सेविका निता कुमावत, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, प्रवीण चव्हाण, साईनाथ राठोड, नरेश कासार, मधुकर  राठोड, भाईदास राठोड, दयाराम राठोड, गोरख राठोड, रोहिदास राठोड, आशा सेविका कविता जाधव व विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड आदी उपस्थित होते.

 

Protected Content