निवृत्ती नगरातील कार्तिक स्वामी मंदिरात पौर्णिमा निमित्त उत्साह

जळगाव प्रतिनिधी । कार्तिक पौर्णिमा निमित्त निवृत्ती नगरातील कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनास उत्साहात सुरुवात झालेली आहे. केरळी महिला ट्रस्टने यंदाचे कोरोना संकटाचा काळ असल्याने भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने दर्शन प्रवेश करताना थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था केलेली आहे. मंदिर परिसरात ऐच्छिक अभिषेकची पूजा व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.

मुहूर्त दर्शनाचा असा आपल्या महाराष्ट्रात पौर्णिमेला महत्व असून, महिला भगिनींना फक्त याच दिवशी कार्तिक स्वामी मंदिरात दर्शन प्रवेश असतो ..मात्र केरळी  महिला ट्रस्ट ने या मंदीरात केरळ प्रमाणेच वर्षभर महिला भगिनींना प्रवेश दिला जातोय. मात्र यंदा कोरोना काळ असल्याने ट्रस्ट ने उपाययोजना म्हणून विशेष काळजी घेतलेली आहे. 

ब्रम्ह मुहूर्तावर सकाळी ३:३० वाजता मंदिर उघडले.४ ते ६ वाजता अभिषेक पूजा झाली.त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. उद्या दुपारी ३:३० वाजेपर्यंत पौर्णिमा असल्याने हा उत्सव उद्या दुपारपर्यंत आहे यामुळे भाविक श्रद्धेने दर्शन घेतात.

Protected Content