गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा

जळगाव प्रतिनिधी | गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए महाविद्यालयात आज राष्ट्रीय गणित दिवस तसेच श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी करण्यात आली.

दरवर्षी भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त भारतात २२ डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने सदर कार्यक्रम महाविद्यालयात साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. “भारतीयांचा गणितामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. जसा आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला तसाच श्रीनिवास रामानुजन यांचा नंबर थेअरी व infinite series मध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे. रामानुजन यांनी त्यांचे गणितामधील काम त्यांच्या कठीण परिस्थितीत सुद्धा चालूच ठेवले. म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा मेहनत व जिद्दीने काम करायला हवे” असे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

याप्रसंगी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित अनिमेटेड क्लिप दाखवण्यात आली. सदर कार्यक्रमास BBA, BCA, MBA विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा.चारुशीला चौधरी, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content