जागतिक योगदिनानिमित्त बहुभाषिक महिला संघातर्फे कार्यक्रम

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जागतिक योगदिनानिमित्त बहुभाषिक महिला संघातर्फे गणेश वाडीतील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील श्री गुरुदत्त मंदिर प्ले-ग्राऊंडवर कार्यक्रम घेण्यात आला.

सुरवातीला ज्येष्ठ नागरिक अरविंद लड्डा, भगवान चौधरी, अध्यक्षा मनीषा दायमा, स्वाती कुळकर्णी, कमलेश शर्मा ह्यांच्या हस्ते श्री परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक मनीषा दायमा ह्यांनी केले. सूत्रसंचालन व आभार सविता नाईक ह्यांनी मानले.

शिबिरामध्ये फिटनेस ऍण्ड कल्चरल स्टुडिओच्या संचालिका तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ट्रेनर व योगशिक्षिका सौ कमलेशजी राजेश शर्मा ह्यांनी योगा बद्दल माहिती दिली तसेच सूर्यनमस्कार,प्राणायम,मेडिटेशन ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच उपस्थितांनी विचारलेल्या योगा बद्दल प्रश्नांचे शंका निरासन केले.

ह्यावेळी परिसरातील महिला, पुरुष व बहुभाषिकच्या राजश्री रावळ, विजया पांडे, अंजली धवसे उपस्थित होत्या. मान्यवरांचा सत्कार मनीषा दायमा व स्वाती कुळकर्णी ह्यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेवक संजय चौधरी, माहेश दायमा, राजेश नाईक, संजयजी कुलकर्णी, पियुष रावळ ह्यांनी सहकार्य केले.

 

Protected Content