Home Cities जळगाव शिष्यवृत्ती परीक्षेत वेदश्री साखरेची दमदार झेप; तालुक्यात दहावी, जिल्ह्यात 112 वा क्रमांक

शिष्यवृत्ती परीक्षेत वेदश्री साखरेची दमदार झेप; तालुक्यात दहावी, जिल्ह्यात 112 वा क्रमांक

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ओरीयन इंग्लिश मीडिअम स्कूलची विद्यार्थीनी वेदश्री प्रशांत साखरे हिने उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात दहावा तर जिल्ह्यात 112 वा क्रमांक मिळविला आहे. तिच्या या यशामुळे शाळेसह कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वेदश्री साखरे हिने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश मिळविले आहे. राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणे ही मोठी कामगिरी मानली जात असून तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. वेदश्री ही सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलचे उपशिक्षक प्रशांत गजानन साखरे आणि उपशिक्षिका विद्या प्रशांत साखरे यांची कन्या आहे. शैक्षणिक वातावरण लाभलेल्या कुटुंबातील संस्कार, पालकांचे मार्गदर्शन आणि नियमित अभ्यासाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे.

तिच्या या यशाबद्दल साखरे व कुळकर्णी परिवारासह नातेवाईक, शिक्षक, मित्र-मैत्रिणी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे. भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची परंपरा कायम ठेवेल, असा विश्वास तिच्या शिक्षकांनी आणि कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. वेदश्री साखरेच्या या यशामुळे ओरीयन इंग्लिश मीडिअम स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेलाही नवे अधोरेखन मिळाले असून तिची ही कामगिरी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.


Protected Content

Play sound