घरासमोरून दुचाकी लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भिकमचंद जैन नगरात घरासमोरून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २७ जून रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसन्न प्रफुल्ल जैन (वय-२७) रा. यश लॉन्स, भिकमचंद जैन नगर जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पाचोरा येथील ऑटो पॉर्टस दुकानात तो कामाला आहे. दैनंदिन कामासाठी त्याच्याकडे (एमएच २० ईएम २७६६) क्रमांकाची दुचाकी आहे. रविवारी २६ जून रोजी रात्री ८.३० वाजता प्रसन्न जैन याने राहत्या घरासमोर त्याची दुचाकी पार्क केली होती. सोमवारी २७ जून रोजी सकाळी ८.३० वाजता उठल्यावर घरासमोर लावलेली दुचाकी दिसून आली नाही. त्याने परिसरात सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळाली नाही. प्रसन्न जैन याने सकाळी १० शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content