नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे निवेदन

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गेल्या आठवड्यात मुक्ताईनगरसह बोदवड तालुक्यात वादळी पाऊस झाल्याने शेतीसह वस्तीचे अतोनात नुकसान झाले. यानुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन मदत उपलब्ध करावी, अशा मागणीचे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे मुक्ताईनगर व बोदवडच्या प्रभारी तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन  देण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार प्रदिप झांबरे यांनी निवेदन स्वीकारले, गेल्या आठवड्यात मुक्ताईनगर व बोदवड तालुक्याच्या काही भागात वादळी पाऊस आणि  गारपीट झाली. यात शेतीचे मोठया प्रमाणात  नुकसान झाले. शेतात असलेल्या केळी कोलमडून केळी उध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले केळीचे पिक वाया गेले. मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात मे महिन्याच्या अखेरीस बागायती कपाशीची लागवड केली जाते. शेतकरी बांधव दिवसरात्र मेहनत घेऊन कपाशी पिक जगवतात. वन्य प्राण्यांपासून त्याचे संरक्षण करतात. परंतु या वादळी पाऊसामुळे व गारपिटीने बागायती कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेले आहेत. तर काही गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे. तरी तहसीलदार यांनी संबंधित महसुल यंत्रणेला आदेश देऊन नुकसानीचे पंचनामे करावे व शासन दरबारी पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना शासनातर्फे मदत मिळवून द्यावी, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, माजी सभापती विलास धायडे, प्रदिप साळुंखे, भागवत पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजुभाऊ माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, सरचिटणीस रवींद्र दांडगे, सुनिल काटे, बाळा भाऊ भाल शंकर,प्रविण पाटील, बापु भाऊ ससाणे, अमिन खान, अनिल पाटील, संजय कपले, संजय कोळी, योगेश काळे, चेतन राजपूत, विनोद काटे, प्रकाश डहाके, ललित पाटील, एजाज खान, चंद्रकांत पाटील, विनोद महाजन, महेश पाटील, एकनाथ प्रधान, जितेंद्र पाटील उपस्थित होते.

Protected Content