‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करा: आ. सुरेश भोळे यांची मागणी

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी| राज्यात प्रदर्शित झालेला ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी आ. सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ले कारवायात बळी पडलेल्या, तसेच हिंदू जनतेवर करण्यात आलेल्या अनन्वित अत्याचाराचे यथार्थ वास्तव चित्रण ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटात करण्यात आले आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट अन्य राज्यात प्रदर्शित झाला असून तेथील राज्य सरकारने करमुक्त केलेला आहे, त्यानुसार महाराष्ट्रात देखील ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्य सरकारने करमुक्त करावा, अशी मागणी आ. भोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे पत्राद्वारे केली असल्याचे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी म्हटले आहे.

Protected Content