जळगावात उद्यापासून चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातर्फे शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये असलेल्या मुले व इतर मुलांसाठी गुरूवार 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयतर्फे बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांमधील मुले व इतर शालेय विद्यार्थींसाठी 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान चाचा नेहरू बालमहोत्सवाच आयोजन करण्यात आले आहे. विविध क्रीडा स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादि घेण्यात येणार आहेत. सदर महोत्सवाचे उद्घाटन 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. आणि सायंकाळी 7.00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,जळगाव विजयसिंग परदेशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content