पाचोऱ्यात श्री १००८ महाराजा अग्रसेन यांची ५१४४ वी जयंती उत्साहात साजरी

पाचोरा, प्रतिनिधी |  शहरात श्री १००८ महाराजा  अग्रसेन यांची ५१४४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दि. ७ रोजी सकाळ पासुन अग्रवाल समाज बांधव व भगिनींनी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

 

श्री १००८ महाराजा अग्रसेन यांची ५१४४ वी जयंतीनिमित्ताने  शहरातील अग्रेसर स्मारकांना फुलहारांनी सजविण्यात आले होते. अतिशय भक्तिमय वातावरणात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तद्नंतर सायंकाळी भडगाव रोडवरील “शक्तीधाम” येथे भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध भजन गायक राजुजी झा महाराज यांनी त्यांचे वाद्य कलाकार यांचे समवेत अग्रवाल समाज बांधवांना आपल्या सुमधुर आवाजाने व संगीतमय वातावरणात मंत्रमुग्ध केले. त्यांनी गायलेल्या भक्तीमय गितांवर अग्रवाल समाज बांधव व भगिनींनी नृत्य करत भक्तिसंध्येचा अलुप्त लाभ घेतला. भक्तिमय संध्येची सांगता १०८ जोडप्यांच्या आरतीने करण्यात आली. उपस्थित भक्तगणांना राजुजी झा यांचे हस्ते आशिर्वादपर भेट देण्यात आली.  या भक्तीसंध्येप्रसंगी सुत्रसंचलन राजेश पटवारी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त अग्रवाल समाज बांधव व भगिनींनी अथक परिश्रम घेतले. आयोजकांतर्फे भाविकांसाठी भोजन व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

Protected Content