कांचन नगरातील आगीत ३ लाख १० हजारांचे मोठे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कांचन नगरातील भैय्याचे वखारीजवळ गॅस सिलेंडरच्या गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत सुभाष भाऊलाला बाविस्कर यांच्या घराला आग लागून संसोरोपयोगी वस्तूंसह एकुण ३ लाख १० हजारांचे मोठे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आले आहे.

सुभाष भाऊलाल बावीस्कर (वय-५०) रा. भैय्याची वखारीजवळ, कांचन नगर, जळगाव यांच्या शेजारी वृद्धाचे निधन झाले आहे. या वृध्दाचा मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी दशक्रिया विधीचा होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वयंपाक करण्यासाठी सुभाष बाविस्कर यांनी त्यांची खोली शेजारच्यांना दिली होती. स्वयंपाक सुरू असताना अचानक पणे गॅस लिक झाला व त्यामुळे अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी भीषण आग लागली. या भीषण आगीत खोलीत असलेले सर्व कपडे तसेच संसार उपयोगी साहित्य सर्व खाक होवून सुमारे ३ लाख १० हजारांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेजारी राहणारे दिवाकर पिंताबर कोळी, मिराबाई दगडू माळी, मिराबाई डिगंबर डोळे यांचे देखील कागदपत्रासह इतर सामान जळून नुकसान झाले आहे. याप्रकरणी सुभाष भाऊलाल बाविस्कर यांनी दिलेल्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात रात्री साडेनऊ वाजता आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहे.

Protected Content