उद्योजकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी भागधारकांसोबत हॉटेल प्रेसिडेंड कॉटेज, एमआयडीसी, जळगाव येथे शुक्रवारी १३ ऑक्टोंबर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती  जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

या कार्यशाळेत विविध विषयावर तज्ज्ञ एमएसएमईबाबत मार्गदर्शन करणार आहेत. एकदिवशीय कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघू, मध्यम उपक्रम, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समिती सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँका इ. यांनी कार्यशाळेत भाग घ्यावा असे आवाहन ही श्री. पाटील यांनी केले आहे.

Protected Content