बांधकामाच्या ठिकाणाहून कॉपर वायर लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांधकामाच्या ठिकाणाहून ४ हजार रुपये किंमतीची कॉपर वायर चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, द्रौपदी नगरात विनोद भाऊराव पाटील (वय-४९) हे वास्तव्यास आहेत. ते बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे द्रौपदी नगरात प्लॉट नं-38  येथे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाच्या ठिकाणी कॉपर कंपनीच्या वायरीचे बंडल होते. बुधवारी ८ जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संबंधित चार हजार रुपये किंमतीचे कॉपर वायरचे बंडल चोरुन नेल्याचे समोर आले. मुस्तकीम भिकन शाह रा, बिसमील्ला चौक, तांबापुरा व त्याचे तीन मित्र अशा चार जणांनी ही चोरी केल्याचा संशय विनोद पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिसात  मुस्तकीम भिकन शाह याच्यासह त्याचे तीन मित्र अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!