विधानपरिषदेसाठी ६ उमेदवार? भाजपला राज्यात गोंधळच घालायचा आहे- राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा |  विधान परिषदे साठी पाच उमेदवार जाहीर करत सहाव्या अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला आहे. यावरून अतिरिक्त उमेदवार देत भाजपला राज्यात गोंधळ निर्माण करायचा असल्याची टीका खा.संजय राऊत यांनी केली आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात ७ उमेदवार आहेत. भाजपने तिसरा उमेदवार देत अगोदरच गोंधळ निर्माण केला असून राजस्थानात देखील एक उमेदवार अतिरिक्त दिला आहे.  तर विधान परिषदेसाठी देखील पाच ऐवजी सहा उमेदवार दिल्यावरून राऊत यांनी हि टीका केली आहे.

विधानसभेत भाजप १०६, कॉंग्रेस ४४, राष्ट्रवादी ५३, शिवसेना ५५ आणि अपक्ष १३ यांच्यासह बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी, एमआयएम, प्रहार प्रत्येकी २, मनसे, मार्क्सवादी, स्वाभिमानी, जनसुराज्य, शेकाप, क्रांतिकारी शेतकरी प्रत्येकी एक असे २८७ आमदार आहेत. यातून विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येकी २७ मतांची गरज असून भाजपचे ४, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि कॉंग्रेसचा एक असे आमदार सहज निवडले जातील. तर कॉंग्रेसची २७ मते वजा जाता दुसऱ्या उमेदवारासाठी किमान १७ मताची आवश्यकता असून जुळवाजुळव करावी लागेल.

राज्यसभेसाठी शिवसेना तर विधान परिषदेसाठी काँग्रेसबरोबर लढत
एमआयएम, समाजवादी किंवा अन्य अपक्ष अशा २९ आमदारांच्या मतांवर एक उमेदवार काढण्यासाठी भाजपा, आणि काँग्रेस मधेच खरी लढत होणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाशी संलग्न असणाऱ्या अपक्षांची मते फोडण्यासाठीच भाजपने सहावा उमेदवार देऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!