दुचाकी अपघातात दाम्पत्य जखमी; एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दुचाकीस्वारावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शाहूनगर हौसिंग सोसायटी येथे गोकूळ उत्तम पाटील हे आपल्या पत्नी जयश्री पाटील यांच्यासह वास्तव्याला आहे. मंगळवार ७ जून रोजी गोकूळ पाटील हे पत्नी जयश्री यांच्यासह दुचाकी (एमएच १९ डीटी १४७७) ने जामनेरकडून जळगावकडे येत असतांना उमाळे फाट्याजवळून जळगावकडून (एमएच १९ डीआर ८३३६) ने सागर सोपान इंधाटे रा. उमाळा ता.जि.जळगाव हा भरधाव वेगाने येवून पाटील दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गोकूळ पाटील व त्यांची पत्नी जयश्री पाटील हे गंभीर जखमी झाले. अपघात घडताच दुचाकीस्वार सागर इंधाटे हा घटनास्थळाहून पसार झाला होता. बुधवार ८ जून रोजी रात्री ९ वाजता गोकूळ पाटील यांच्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार सागर इंधाटे याच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफार तडवी करीत आहे.

Protected Content