कपाशी चोरणारे दोन भामटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेतातून कापूस चोरून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरून नेलेला कापूस आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कापूस चोरी प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात कापूस चोरी झाल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्वतंत्र पथक तयार केले. यामध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील, ईश्वर पाटील, मुरलीधर भारी, अशोक पाटील यांना कारवाईसाठी रवाना केले.

 

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील कापूस खरेदी करणारे प्रविण पांडूरंग पाटील यांची चौकशी केली असता त्यांना दोन जणांनी चोरी कापूस विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने बुधवार ९ मार्च रोजी दुपारी संशयित आरोपी नशिरोद्दिेन युसुफ तडवी ( वय-२९) आणि  आशिक अजित दळवी (वय-१९) दोन्ही रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा यांना ताब्यात घेतले. दोघांनी मिळून ११ हजार २२५ रूपये किंमतीचा १ क्विंटल ५२ किलो वजनाचा कापूस चोरी केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि ॲपे रिक्षा जप्त केले आहे. दोघांवर कारवाई करून पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे.

Protected Content