हे क्षणीक सुख…जनता याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही ! -आ. राजूमामा भोळे (व्हिडिओ )

 

जळगाव राहूल शिरसाळे । आमच्या पाठपुराव्यामुळे २५३ कोटी रूपयांचे हुडकोचे कर्ज माफ झाले याचे लेखी पुरावे आहेत. यामुळे त्यांनी केलेली घाण आम्ही साफ केली तरी आता उलट आरोप करण्यात येत असल्याची टीका आज भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी केली. तर भाजप विरोधी मतदान करणार्‍या २७ नगरसेवकांच्या विरूध्द न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यांनी जे काही केले ते क्षणीक सुख असून जनता याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील राजूमामांनी दिली आहे.

हुडकोचे कर्ज नील झाले नसल्याचा आरोप शिवसेनेने केलेला आहे. यास उत्तर देतांना आ. राजूमामा भोळे यांनी स्पष्ट केले की, तत्कालीन राज्य सरकारने आधीच १२५ कोटी माफ केले आहे. १२५ कोटी जीएसटीच्या माध्यमातून तेही बिगर व्याजाने दिले आहेत याबाबत आभार मानायला हवेत.  याला कोणत्याही प्रकारचे व्याज लावण्यात आलेले नसून  हुडकोचे कर्ज नील झाले असल्याचा दावा करत हे सर्व कागदोपत्री आहे.  कर्ज नील झाल्यानेच ७० कोटींच्या रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.  कोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेची खाती किती वेळा सील करण्यात आली याबाबत जळगावकराना माहित असल्यचा टोला आ. भोळे यांनी लगविला.  जनता भाजप सोबत आज आहे व उद्याही राहील असा आशावाद आ. भोळे यांनी व्यक्त केला. 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/138179694905720

Protected Content