भाजप — शिवसेनेच्या कलगीतुऱ्यात महापालिका अर्थसंकल्पीय तरतुदींना कपातीची कात्री ( व्ही डी ओ )

 

 

जळगाव, प्रतिनिधी ।   आज स्थायी समितीत भाजप व शिवसेनेत प्रशासनाने मांडलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करतांना वेळोवेळी खटके उडाले. तर सभापती यांनी माघार घेत काही बाबींसाठी प्रस्तावित तरतूदीतील रक्कम कमी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

 

महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. शिवसेनेचे नीतीन लढ्ढा यांनी महापालिकेची कोट्यवधीची मालमत्ता पडून आहे.   स्व मालकीच्या जागा असताना राज्य शासनाकडे भीक का मागावी असा प्रश्न उपस्थित करत ट्रान्सपोर्ट नगरच्या जागेबाबतचा विवाद मार्गी लावल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.  यावर आयुक्त सतीश कुळकर्णी यांनी उत्पन्न वाढीसाठी नाविन्य पूर्ण योजना आखावी लागेल याकडे लक्ष वेधले.  मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता विभाग स्वतंत्र तयार करण्यात आला असल्याची माहिती दिली. या विभागासाठी स्वतंत्र उपायुक्त देखील असतील असे स्पष्ट केले.

 

याच वेळी उत्पन्न व खर्चातील तफावत दूर करून वास्तववादी बजेट सादर करावा  अशी मागणी कुलभूषण पाटील यांनी केली. यावर उज्ज्वला बेंडाळे यांनी  आम्ही बजेट सादर करत आहोत ही तफावत दूर करण्याची संधी तुम्हाला असल्याचे उपरोधिक टोला लगवला.  सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी  वास्तववादी आकडे कोणी ठरविले ? असा प्रश्न उपस्थित करत पूर्ण बजेट महासभेत मांडला जाणार आहे याचा फायदा तुम्हाला  होईल  अशा   कानपिचक्या  दिल्या .

 

संसर्गजन्य रोगप्रतीबंधित  उपाययोजनेसाठी प्रशासनातर्फे १० लाखांची तरतूद  सुचविण्यात आलेली असतांना भाजपतर्फे १५ कोटींची तरतूद मागणी करण्यात आली होती. मात्र, याला नितीन लढ्ढा यांनी विरोध करत कोरोनाचा काळ असल्याने विविध स्तरावरून निधी मिळत असतांना १५ कोटींची तरतूद करणे संयुक्तिक नसल्याने सांगून ही तरतूद १५ कोटींवरून ३ कोटी करण्यात याची अशी सूचना मांडली असता ती मान्य करण्यात आली.

 

उज्वला बेंडाळे यांनी नाले सफाईसाठी प्रभाग निहाय निधी देण्यात यावा अशी सुचना मांडून प्रभाग समिती क्र. १ साठी ३ लाख , प्रभाग समिती क्र. २ साठी ५ लाख, प्रभाग समिती ३ साठी १० लाख तर प्रभाग समिती ४ साठी ५ लाख तरतूद करण्याची सूचना मांडली असता ती मान्य करण्यात आली. आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी प्रभाग समिती सक्षम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.  मात्र, स्टाफ अभावी मुख्य कार्यालयातून कामकाज चालत  असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.  प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येकी ५ लाख प्रमाणे ८० नगरसेवकांसाठी  ५ कोटींची तरतूद करण्यात यावी अशी दुरूस्ती सुचविण्यात आली. मात्र, आधीच नगरसेवकांचे मानधन थकीत असताना असा निधी देणे कितपत संयुक्तिक आहे असा प्रश्न शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला असता ही तरतूद देखील रद्द करण्यात आली आहे.

 

उज्वला बेंडाळे यांनी  संसर्गजन्य रोगप्रतिबंधक उपाययोजनेसाठी १५  कोटीची तरतुदी करण्यात येऊन त्यात  १००  ऑक्सीजन बेड ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी मागणी केली.  याला उत्तर देतांना आयुक्त कुलकर्णी यांनी मोहाडी येथे ४०० ऑक्सीजन  बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून ही सुविधा शनिवार पासून जळगाव शहर व परिसरातील गावातील लोकांसाठी खुली होणार असल्याचे स्पष्ट करत १५ कोटींन एवजी २ कोटींची तरतूद केल्यास पुरेशे होईल असे मत मांडल्याने ही तरतूद ३ कोटी करण्यात आली.

 

प्रत्येक नगरसेवक ५ लाख याप्रमाणे ८० नगरसेवकांसाठी ४ कोटींची तरतूद करावी अशी मागणी उज्ज्वला बेंडाळे यांनी केली.  हा निधी मागील अडीच वर्षात कधी मिळाला नसून  नगरसेवक निधीचा फायदा काय  झाला असा प्रश्न नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. याला उत्तर देतांना सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी नगरसेवकांनी मागणी करायला हवी होती असे  उत्तर दिले.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/302571487964984

 

Protected Content