धक्कादायक : बनावट कागदपत्र आणि मालक उभा करून विकली दुसऱ्याची शेती

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील साकळी येथील एका व्यक्तीची शेती तलाठी कार्यालयातील पंटर, स्टेपंवेंडर आणि दुय्यम निबंधक यांनी बनावट कागदपत्राच्या आधारावर संगनमताने परस्पर बोगस व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

 

याबाबतची मिळालेली माहीती अशी की , यावल तालुक्यातील साकळी येथील एका शेतकऱ्याची शेती भामट्यांनी संगनमत करून यावलच्या दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस शेतमालकास उभे करून बनावट कागद पत्रांच्या आधारावर परस्पर शेतीची लाखो रुपयात विक्री करुन फसवणुक केली आहे. साकळी शिवारात असलेल्या ९१ आर मालमताही मुळ यावल राहणारे दोन भावडांच्या नावांवर असून काही तथाकथित एजंट, तलाठी कार्यालयातील पंटर, स्टेम्पवेडंर आणि दुय्यम निबंधकांनी मालमता धारकाच्या नावांवर बनावट आधार कार्ड , पॅनकार्ड आदी तयार करून बनावट शेतमालक दर्शवून सदरची ९१ आर शेत हे ३ लाख ६३ हजार रुपयांना परस्पर विक्री केली आहे. सदरची बनावट शेत विक्री १० जानेवारी २०२० रोजी यावलच्या दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली आहे.
सदरच्या या शेतीचे खरे मालक दोघ भाऊ हे मुळ यावलचे रहीवासी असून ते नाशिक येथे राहतात. त्यांच्या शेताची दोन महीन्यापुर्वीच विक्री झाल्याची माहीती मिळताच त्यांना आर्श्वयाचा धक्काच बसला. याबाबत दोघं भाऊ यावल येथे आल्यावर कायदेशीर तक्रार करणार असल्याचे कळते. या बनावट शेतमालकाचा पत्ता अकोला दाखविण्यात आला असून पॅनकार्ड व आधारकार्ड देखील बनावट असल्याचे कळते. अशा प्रकारे बनावट दस्ताऐवज तयार करण्यात काही स्टॅम्पवेंडर पटाईत असून तलाठी व ग्रामसेवक व भुमी अभिलेख कार्यालयात खरेदी केलेली मालमतेचे अ पत्रक, ड पत्रक व सिटीएस पत्रक असे दिले जाते. मात्र, याचा काहीही उपयोग होत नसुन संबंधीत खरेदी विक्री करणार दुय्यम निबंधक कार्यालयातुन खरेदीचे दस्ताएवज सुचि कमांक २ इंडेक्स काढुन विस रुपयांचे टिकीट अर्जावर लावुन आर्थिक देवाण-घेवाण करून उताऱ्यावर नांवे लावण्याच्या अटीशर्ती धाब्यावर बसवून तात्काळ आपल्या नावांची नोंद करून घेत असल्याचे प्रकार घडत आहेत. यावलच्या दुय्यम निबंधक कार्यालयात देखील अशा प्रकारातुन काही वेंडरांची मालमत्त्ता कोटयावधीच्या घरात गेली असुन या सर्व प्रकाराची सखोल चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Protected Content