Home क्राईम विहिरीत आढळले 5 मृतदेह ; गावात भितीचे वातावरण

विहिरीत आढळले 5 मृतदेह ; गावात भितीचे वातावरण

0
143


bulthana 2

 

बुलडाणा प्रतिनिधी । मेहकर तालुक्यातील माळेगाव येथील एका विहिरीत आज सकाळी एकाच कुटुंबातील 5 जणाचे मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामृतांमध्ये आईसह ४ मुलींचा समावेश आहे. आई उज्वला ढोके (वय-३५), मुलगी वैष्णवी ढोके (वय-९), दुर्गा ढोके (वय-७), आरुषी ढोके (वय-४) आणि पल्लवी ढोके या १ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. एकाच घरातील पाच जणांचा मृतदेह विहिरीत सापडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्व मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. आता हे पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत. या घटनेचे अद्यापही कारण समजू शकले नाही आहे.


Protected Content

Play sound