पाळधीतील मेळाव्याच्या निमित्ताने भाजपने शिवसेनेला डिवचलेय का ?

26ca9fc3 bd61 404b 9afe d814d1facdc1

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आज होत असलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्याची पूर्वतयारी अज्ञात लोकांनी मध्यरात्री उधळून लावल्यामुळे निवडणुकीची रंगत सुरु होण्याआधीच राजकीय वाद उफाळून आला आहे. परंतू राज्यात युती निश्चित असल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतरही शिवसेनेचा पारंपारिक मतदार संघ असणाऱ्या जळगाव ग्रामीणमध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार आक्रमक राजकीय चाल का चालताय?. थोडक्यात पाळधीतील मेळाव्याच्या निमित्ताने भाजपने शिवसेनेला डिवचलेय का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. तर यावर आता ना.गुलाबराव पाटील काय बोलतात? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

आज जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भाजपाचा कार्यकर्ते पाळधी येथे आयोजित करण्यात आला आहे. परंतू काल रात्री १ वाजेच्या सुमारास मेळाव्याच्या ठिकाणी काही लोकांनी येऊन तोडफोड केली. स्वयंपाक चालू असताना भांडे व भाज्या फेकल्या. तसेच खुर्च्या ही तोडल्या. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्याबरोबर धरणगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. परंतू तोपर्यंत तेथे कोणीच नव्हते. परंतू आज सकाळपर्यंत कोणीही तक्रार न दिल्यामुळे कोणताही गुन्हा दाखल नव्हता. त्यामुळे तोडफोड करणारे कोण होते? हे अद्याप समजू शकलेले नाही.

 

भाजपने थेट शिवसेनच्या गडात मेळावा ठेवल्यामुळे युतीत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. वास्तविक बघता जळगाव ग्रामीणमध्ये धरणगाव सर्वात मोठे गाव असतांनाही चक्क विद्यमान आमदार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात भाजपच्या इच्छुकांनी मेळाव्याचे आयोजन केले. पाळधीतील या मेळाव्याचा निमित्ताने भाजपने शिवसेनेला डिवचतेय का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. तर मेळाव्याचे आयोजन पाळधीत करून भाजपचे इच्छुक उमेदवार त्यांची निवडणुकीची रणनीती आक्रमक असल्याचे दाखवून देत आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील हे देखील प्रचंड आक्रमक नेते मानले जातात.त्यामुळे भविष्यात शिवसेना-भाजपमधील संघर्ष वाढू शकतो. तर गुलाबराव पाटील आपल्या भाषणातून भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा चांगलाच समाचार घेण्याची शक्यता आहे.

 

वास्तविक बघता लोकसभेच्या वेळी शिवसेनेने प्रामाणिकपणे काम केले होते. त्यामुळे भाजप विधानसभेला मदत करेल, असे शिवसेना गृहीत धरून होती. परंतू युतीचे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही भाजपचे इच्छुक उमेदवार ज्या आक्रमक पद्धतीने प्रचाराला सुरुवात करताय. यावरून युती होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. युतीचा निर्णय होण्याआधीच ज्यापद्धतीने भाजपचे इच्छुक उमेदवार आक्रमकता दाखवता आहे, यावरून निवडणूक प्रचंड वादग्रस्त होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Protected Content