मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याकडून भुसावळात पाहणी !

 

भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) संजीव मित्तल आज (ता. ६) भुसावळच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी रेल्वेचे पीओएच, मालगाडी परिक्षण, झेडआरटीसीला भेट दिली. तसेच आरओेएच डेपो जवळील नवीन पुलाचे त्यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

 

आज (ता. ६) पहाटे ४.३५ वाजता श्री. मित्तल यांचे भुसावळ जंक्शनवर आगमन झाले. यावेळी मध्य रेल्वेचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले. सकाळी पावणे दहला रेल्वे स्थानक परिसरात महिला दिन पंधरवडानिमित्त नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये रेल्वे स्कूल चे प्राचार्य सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे महिला कर्मचाऱ्यांनी नाटक सादर केले. यावेळी महाप्रबंधक संजीव मित्तल यांचेसह प्रधान मुख्य विद्युत अभियंता अतुल पाठक, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी ए. के. सिन्हा, प्रधान मुख्य सरक्षा अभियंता एस. पी. वावरे, मध्य रेल्वेचे प्रमुख अधिकारी, मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता, अप्पर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा आदी उपस्थित होते. महाप्रबंधक श्री. मित्तल यांनी या नाटकास दहा हजार रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला. रेल्वे विद्युत इंजीन कारखान्याचे (पीओेएच) आणि तेथील वर्कशॉपला श्री. मित्तल यांनी भेट देऊन निरीक्षण केले. यानंतर मालगाडीचे परिक्षण केंद्रात निरीक्षण करण्यात आले.

Protected Content