जिल्ह्यात आज ५९६ कोरोना बाधित रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या कोरोनाच्या जिल्ह्याच्या अहवालातून बाधितांचा आकडा कमी होतांना दिसून येत आहे. आज जिल्ह्यात ५९६ कोरोना बाधित रूग्ण आढळले असून ६०५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्याशी कोरोनाची खुन्नस अजून संपलेली नसली तरी अत्यंत उतरत्या क्रमाने खाली जात असलेला हा आकडा दिलासादायक वाटत आहे, तथापि पूर्ण धोका टळलेला नाही. समूह संसर्गाने पुन्हा उसळी घेऊ नये म्हणून आपल्या जिल्ह्याला गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे पुढचा आठवडा अत्यंत महत्वाचा ठरणार असल्याचे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१००; जळगाव ग्रामीण-३२; भुसावळ-८८; अमळनेर-७; चोपडा-५५; पाचोरा-२०; भडगाव-२६; धरणगाव-२७; यावल-३९; एरंडोल-२४, जामनेर-४२; रावेर-२८; पारोळा-३६; चाळीसगाव-२९; मुक्ताईनगर-२४, बोदवड-९ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १० असे एकुण ५९६ रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-९८१४, जळगाव ग्रामीण-२२३८; भुसावळ-२६८९; अमळनेर-३८३६; चोपडा-३६८६; पाचोरा-१७०७; भडगाव-१६९८; धरणगाव-१९५१; यावल-१४४७; एरंडोल-२६२३, जामनेर-३०९९; रावेर-१८०८; पारोळा-२२३५; चाळीसगाव-२८४४; मुक्ताईनगर-११८०, बोदवड-७०८ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ३३४ असे एकुण ४३ हजार ८९७ रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ४३ हजार ८९७ इतकी झालेली आहे. यातील ३२ हजार ९४१ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ६०५ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १६ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १०९६ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९ हजार ८६० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content