यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्यातील भाजपा नेत्यांवर झालेल्या आरोपांची तात्काळ सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणीसाठी भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. व विविध मागण्यांचे निवेदन बुधवार ९ मार्च रोजी सकाळी यावल नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले आहे. विरोधकांना नष्ट करून लोकशाही उध्वस्त करण्याच्या या धक्कादायक प्रकाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा लोकशाही पद्धतीने मुकाबला करता येत नाही म्हणून महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सरकारी वकिलामार्फत पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आ.चंद्रकांत पाटील, माजी मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार, मा.मंत्री आ.गिरीश महाजन, आ.चंद्रशेखर बावनकुळे, आ.जयकुमार रावल, सुभाष देशमुख यांना गुन्ह्यांमध्ये अडकविण्यासाठी कारस्थान रचले. ते आता उघड झाले आहे.
या गंभीर कारस्थानाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन यावल भाजपाच्या वतीने यावलचे नायब तहसीलदार राहूल सोनवणे यांना देण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस उज्जेनसिंग राजपूत, तत्कालीन नगरसेवक डॉ .कुंदन फेगडे, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, शहराध्यक्ष निलेश गडे, अजय भालेराव, बबलू घारू, माजी जिल्हा चिटणीस किशोर कुलकर्णी, व्यापारी तालुकाध्यक्ष अतुल चौधरी, शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी, राहुल बारी, ॲड. गोविंदा बारी, शहर सरचिटणीस परष नाईक, युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी, चिटणीस अस्वजीत सिसोदिया, शाखाध्यक्ष ललित परमार्थी, सोशल मिडिया सेल तालुकाध्यक्ष स्नेहल फिरके, सागर लोहार, दिपक फेगडे, मनोज बारी, उदय बाविस्कर, संतोष कोळी, नारायण ढाके यांच्यासह आदींची उपस्थिती होती.