तालुक्यातील नावरेगाव येथे संविधान आर्मी शाखेची स्थापना

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील नावरेगाव येथे सविधान आर्मी शाखेची स्थापना राष्ट्रीय आर्मी चीफ जगन सोनवणे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी गावातून विशाल संविधान रॅली काढण्यात आली.

यावेळी संविधान आर्मी चीफ जगन सोनवणे यांचे गावात जोरदार स्वागत करण्यात आले. राकेशभाई बग्गन, शैलेश सैदाणे, राहुल साळुंके, रतन वानखेडे व मेढे सर्व कार्यकारिणी सविधान आर्मीची जाहीर करण्यात आली. देशभरात 4 लाख आणि महाराष्ट्रात एक लाख संविधान रक्षक सैनिक तयार करनार – सविधान आर्मी राष्ट्रीय चीफ जगन सोनवणे यांची माहिती आज देशात सविधान धोक्यात असल्याने व संविधान विरोधी देशद्रोही सैतान यांच्या विरोधात ५ लाख सविधान रक्षक सैनिकाची फौज तयार करण्यात येणार आहे.

एक लाख सविधान रक्षक सैनिक महाराष्ट्रातत व उर्वरित ४ लाख सविधान रक्षक सैनिक देश भरात तयार करण्यात येणार आहे. सविधान आर्मी व सविधान रक्ष्क युवक सैनिकांची आता ही लाट कोन्ही रोखू शकत नाही. सविधान आर्मी मुळे युवकांमध्ये प्रचंड चैतन्य निर्माण झाले अशी माहिती सविधान आर्मी राष्ट्रीय चीफ जगन सोनवणे यांनी आज यावल तालुक्यातील नावरे गाव या गावात पार पडलेल्या सविधान आर्मी शाखेच्या उदघाटन प्रसंगी केले.

Protected Content