सुषमा स्वराज अनंतात विलीन !

sushama swaraj 1

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे काल (दि.६) रात्री साडे दहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले, त्या ६७ वर्षांच्या होत्या. आज (दि.७) सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर येथील एका विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

त्यांची कन्या बांसुरी हिने त्यांना मुखाग्नी दिला. तत्पूर्वी त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी भाजपासह सगळ्याच पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्यात कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे. सुषमा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Protected Content