पाचोऱ्यात बालाजी रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा रुट मार्च

पाचोरा, प्रतिनिधी । आगामी श्री बालाजी रथोत्सव निमित्ताने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देश्याने पाचोरा पोलिस स्टेशन व राज्य राखीव दलाच्या सैनिकांचा शहरामध्ये रुट मार्च काढण्यात आला.

 

याप्रसंगी एस.आर.पी. प्लाटुनचे अधिकारी, २० कर्मचाऱ्यांसह पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, विकास पाटील, गणेश चौबे, गोपनीय शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल नितीन सुर्यवंशी, किशोर पाटील, पोलिस हवालदार यशवंत घोडसे, दिपक सुरवाडे यांच्यासह पाचोरा सर्व पोलीस बांधवांतर्फे व राज्य राखीव दलाच्या सैनिकांमार्फत आगामी रथोत्सवा निमित्ताने शहरामध्ये शांतता राखली जावी यासाठी हा रुट मार्च काढण्यात आला.

Protected Content