रावेरात बंद घर फोडून रोकड लांबविली

रावेर प्रतिनिधी । शहरातील रामचंद्र नगर परिसरात मध्यरात्री बंद घरफोडून अज्ञात चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील रामचंद्र नगर परीसरात असणारे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना मध्य रात्री घडली आहे. केलेल्या चोरीत रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती येत असून यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेल आहे.घर मालक बँकेत नोकरी निमित्त बाहेर असल्याने अद्याप रावेर पोलिसात गुन्ह्या दाखल झालेला नाही.

Protected Content