सपा-बसपाचे दहा आमदार भाजपमध्ये जाणार

लखनऊ वृत्तसंस्था | समापवादी पक्ष आणि बसपाचे तब्बल दहा आमदार लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून यामुळे निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

भाजपने  समाजवादी पक्ष आणि बसपाला खिंडार पाडण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे. सपा-बसपचे १० आमदार उद्या भाजपमध्ये सामील होणार आहेत. माहितीनुसार, सपाचे रविशंकर सिंह पप्पू, सीपी चंद, अक्षय प्रसाद सिंह आणि बसपाचे बृजेश कुमार सिंह यांच्यासह १० आमदार भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.

ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचा त्यांच्या भागात चांगला प्रभाव आहे, अशा नेत्यांना निवडणुकीपूर्वीच फोडण्याच्या भाजपचा प्रयत्नात आहे. देशात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळीही भाजपने हाच फॉर्म्युला अवलंबला होता. तेव्हा कॉंग्रेसचे सर्व बडे दिग्गज भाजपमध्ये सामील झाले होते आणि २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळीही भाजपने हाच फॉर्म्युला राबवला होता.

Protected Content